Welcome to Chatrapati Multistate

Welcome to Chatrapati Multistate

Best-FD-Schemes-that-Provide-Excellent-Returns-on-Investment-in-Chatrapati-Multi
Chhatrapati Multistate Blog Image

गुढीपाडव्यानिमित्त दमदार ऑफर ! सुरक्षेसोबत मोठे रिटर्न्स मिळविण्याची सुवर्णसंधी !

18 March 2023

मागील काही वर्षांपूर्वी सर्वसामान्यांकडून बचतीला खूप महत्व दिलं जात असे, गुंतवणूक ही विशिष्ट वर्गापर्यंतच मर्यादित होती. परंतु आज सर्वसामान्यही गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत.

पैशांची गुंतवणूक कशी आणि कुठे करावी हा सर्वसामान्यांच्या मनातील महत्वाचा प्रश्न ! कारण आपला पैसा सुरक्षित राहणे व योग्य परतावा ही मिळणे त्यांना अपेक्षित असते. छत्रपती मल्टीस्टेट आपणांस पैसा योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्यास मदत करते !

गुंतवणूक ही भविष्यासाठी अतिशय उपयोगी ठरते, आजच्या आर्थिक पूर्वनियोजनातून भविष्यात काही महत्वाचे खर्चिक व सुधारणात्मक ध्येय पूर्ण करण्यासाठी पैसे अथवा मालमत्ता यांची गुंतवणूक करणे फायद्याचे ठरत असते.

मार्केटमध्ये सध्या पैसे गुंतवणूक करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. जसे; मुदत ठेव (FD), आवर्ती ठेव (RD), स्टॉक्स गुंतवणूक, म्युच्युअल फंड गुंतवणूक, सोने गुंतवणूक, रिअल इस्टेट गुंतवणूक, बाँड गुंतवणूक इ.

आपल्याला आपला पैसा सुरक्षित राहावा आणि उत्तम परतावाही मिळावा असे वाटत असेल, तर FD हा सर्वोत्तम पर्याय आहे. याउलट गुंतवणुकीमध्ये जर रिस्क घेऊन आपण गुंतववूक करीत असाल, तर गुंतवलेल्या रकमेवर परतावा चांगल्या प्रकारे मिळतो, परंतु तुमची मुद्दल सुरक्षित नसते. म्हणजे आपण आपल्याकडे असणारी रक्कम जर योग्य ठिकाणी गुंतवली तर परतावाही मिळतो आणि रक्कम सुरक्षित राहते. तुम्हाला गुंतवणूक करून अधिकाधिक लाभ कोणत्या ठिकाणी होऊ शकेल, याचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

FD गुंतवणुकीचे फायदे -
  • सुरक्षित व निश्चित परतावा मिळतो.
  • मार्केटच्या चढ-उताराचा कोणताही परिणाम होत नाही.
  • FD रकमेइतका अपघाती विमा मोफत मिळतो.
  • गरजेच्यावेळी FD वर कर्ज घेता येते.
  • FD मध्ये गुंतवणूक केल्याने आपल्या अनावश्यक खर्च टाळता येतो.
  • योग्य वेळी केलेल्या गुंतवणूकीतून भविष्यात आपण मोठी संपत्ती निर्माण करू शकतो.
  • भविष्य आनंदी, आर्थिक सुरक्षित करायचे असल्यास गुंतवणूक महत्वपूर्ण ठरते.
  • गुंतवणुकीमुळे आर्थिक बचत करण्याची सवय लागते.
  • शिक्षण, व्यवसाय यांसह कुटुंबाच्या इतर गरजांसाठी गुंतवणुकीमुळे मदत होते.

तुमची आर्थिक ध्येये, स्वप्ने पूर्ण करण्यासाठी गुढीपाडव्याच्या या शुभमुहूर्तावर छत्रपती मल्टीस्टेटमध्ये FD केल्यास तुम्ही स्वयंपूर्ण होऊ शकाल ! सध्या छत्रपती मल्टीस्टेट FD वर ११ % हून अधिक व्याजदर देऊ करीत आहे. सोबतच छत्रपती मल्टीस्टेटकडून कालावधी निवडण्याचे विविध पर्यायही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

आजच छत्रपती मल्टीस्टेटच्या जवळील शाखेस भेट द्या ! कॉल - १८०० २१२ ५५५ ४४४

WhatsApp here