Welcome to Chatrapati Multistate

Welcome to Chatrapati Multistate

During-festival-days-chatrapati-multistatehhasbbrought-profitable-FD-offers
Chhatrapati Multistate Blog Image

छत्रपती मल्टीस्टेट सणासुदीच्या दिवसात घेऊन आली आहे फायदेशीर FD ऑफर्स

16 October 2023

सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करून, पैशांची सुरक्षा आणि भक्कम व्याजदर देणारी शहरातील एकमेव विश्वासार्ह संस्था म्हणजे छत्रपती मल्टीस्टेट. बँकिंग क्षेत्रात छत्रपती मल्टीस्टेटने ग्राहकांच्या विश्वासातून आपले एक स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. छत्रपती मल्टीस्टेटसोबत सर्वोत्कृष्ट बँकिंग विश्वात आता तुम्हीदेखील सामील व्हा. महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील २१ शाखांसह छत्रपती मल्टीस्टेटने ग्राहकांना अत्यंत विश्वसनीय आणि तत्पर बँकिंग सेवा पुरवली आहे. १ लाखाहून अधिक समाधानी ग्राहक सांभाळणाऱ्या छत्रपती मल्टीस्टेटने ग्राहकांच्या सर्व आर्थिक गरजा पूर्ण केल्या आहेत. नवरात्री उत्सव, दसरा आणि दिवाळीनिमित्त छत्रपती मल्टीस्टेट ग्राहकांसाठी घेऊन आली आहे भरघोस व्याजदर देणाऱ्या अनेक मुदत ठेव (Fixed Deposit) योजना, तसेच बँकिंग व्यवहार सुलभ करणारे अनेक पर्याय.

* महिलांसाठी अनोखी ऑफर

नवरात्रीच्या पावन पर्वात आणि पुढील काळातही महिलांना मुदत ठेवीवर आकर्षक व्याज मिळवून देणारी ही ऑफर आहे. यात ९९ दिवसांच्या FD वर ९% व्याजदर मिळणार आहे. त्यातही फक्त महिलांसाठी ०.५% अधिक व्याजदर देण्यात येत आहे. आहे की नाही, कमाई करण्याची सुवर्णसंधी. महिलाशक्तीला मोठे आर्थिक बळ पुरविणारी ही संधी आहे.

* मुदत ठेवीवर भरघोस रिटर्न्स !

यंदाच्या दिवाळी सणात छत्रपती मल्टीस्टेट घेऊन आली आहे ग्राहकांसाठी शानदार दीपावली ऑफर. यात रु. १० लाख FD मध्ये गुंतवा ३६५ दिवसांसाठी आणि त्यावर सर्वाधिक ११% व्याजदर मिळवा. सोबतच इतर अनेक उपहार मिळणार आहेत. ग्राहकाला चांदीचे नाणे मिळेल. तसेच कुटुंबातील ५ जणांचे सेव्हिंग अकाउंट, २ जणांचे करंट अकाउंट कुठलेही शुल्क न आकारता उघडण्यात येईल.

* धनवान बनवणारी धमाका ऑफर !

दीपावली सणानिमित्त छत्रपती मल्टीस्टेट ग्राहकांना धनवान बनवणारी ऑफर देत आहे. यात आपली रक्कम १८१ दिवसांच्या FD मध्ये गुंतवायची आणि त्यावर सर्वाधिक १०% व्याजदर मिळवायचा. सोबत ग्राहकांना मिळेल आकर्षक सिल्व्हर कॉईन फ्री. कालावधी कमी आणि फायद्याची हमी अशी ही ऑफर आहे.

* व्यावसायिकांसाठी आली सुवर्णसंधी !

लघु व्यावसायिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी छत्रपती मल्टीस्टेट घेऊन आली आहे शानदार करंट अकाउंट उघडण्याची सुवर्णसंधी. व्यावसायिकांना सर्वाधिक फायदेशीर ठरणारे 909 करंट खाते. हे खाते उघडणाऱ्या व्यावसायिकांना आता खात्यावर बॅलेन्सची चिंता करण्याची गरज नाही. कारण हे आहे झिरो बॅलन्स अकाउंट. सोबतच व्यावसायिकांना रोजच्या व्यवहारासाठी RTGS, NEFT, IMPS या सुविधा नि:शुल्क वापरता येतील. तसेच मोबाईल बँकिंग, QR कोड सुविधेचा फायदा मिळेल. सोबतच काही अटींच्या अधीन राहून एक लाखाचा अपघाती विमाही मिळेल. * युवावर्गाला फायद्याचे सेव्हिंग खाते

शिक्षण, नोकरी करणाऱ्या युवकांना बँकेत खाते उघडायचे असेल, तर छत्रपती मल्टीस्टेट अशा सर्वांसाठी घेऊन आली आहे टेन्शन फ्री बँकिंग सेवा. छत्रपती मल्टीस्टेटमध्ये आजच उघडा तुमचे SA 99 सेव्हिंग खाते. या खात्याची विशेषता अशी की, तुम्ही शून्य रकमेवर अकाउंट उघडू शकता. सोबतच अनेक बँकिंग सेवाही तुम्हाला अगदी मोफत मिळतील. छत्रपती मल्टीस्टेटची ही ऑफर सर्वांसाठी आहे. या खात्यावर व्यवहार करण्यासाठी अकाउंटवर बॅलन्सची मर्यादा नाही. तुम्हाला RTGS, NEFT, IMPS अशा पेमेंट सुविधा, तसेच मोबाईल बँकिंगदेखील मोफत मिळेल. त्याचबरोबर काही अटी आणि शर्तींवर एक लाखाचा अपघाती विमाही मिळवता येईल.

मुदत ठेवींवर भरघोस व्याजदर मिळवण्याची ही अपूर्व संधी पुन्हा येणार नाही. त्यामुळे येणाऱ्या सण आणि उत्सवांच्या शुभमुहूर्तावर तुम्हीदेखील आर्थिक समृद्धीच्या आणि प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका. छत्रपती मल्टीस्टेटसोबत आनंदाचे क्षण साजरे करा. कमी कालावधीत पैशांच्या गुंतवणुकीवर सर्वाधिक रिटर्न्स मिळवून सण-उत्सवांचा आनंद द्विगुणित करा. आजच छत्रपती मल्टीस्टेटच्या जवळील शाखेला भेट देऊन निर्णय घ्या मोठ्या गुंतवणुकीचा. छत्रपती मल्टीस्टेट परिवारातर्फे आपणा सर्वांना नवरात्री उत्सव, दसरा आणि दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

WhatsApp here